मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्यात आले आहे. पाच वेगवेगळ्या खंडणी प्रकरणात आरोपी असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना फरार घोषित करा, असा अर्ज मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दाखल करण्यात आला होता. आता यावर मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले आहे. दरम्यान, अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने गुन्हे शाखे तर्फे करण्यात आलेल्या या अर्ज़ाला मंजूरी दिली आहे. गोरेगाव वसूली गुन्ह्याच्या प्रकरणात गुन्हे शाखेने न्यायालयाकडे हा अर्ज केला होता. त्यानंतर हा अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे.
(हेही वाचा – केंद्र शासनाच्या ‘या’ निर्णयाने कानाकोपऱ्यात पोहोचणार 4G सेवा!)
…तर अडचणीत होणार मोठी वाढ
परमबीर सिंह यांना फरार घोषित केल्यानंतर आता परमबीर सिंह यांना ३० दिवसांची मुदत दिली जाणार आहे. या ३० दिवसात परमबीर सिंह जर न्यायालयासमोर हजर झाले नाहीत तर त्यांची मालमत्ता सील करण्याचा अधिकार राज्य सरकारला मिळणार आहे. परमबीर सिंह यांना फरार घोषित केल्यानंतर आता त्यांच्या अडचणीत मोठी वाढ होणार आहे.
परमबीर यांच्यासह इतर दोन आरोपी फरार
मिळालेल्या माहितीनुसार, परमबीर सिंह यांच्या व्यतिरिक्त रियाझ भाटी आणि विनय सिंग उर्फ बबलू या इतर दोन आरोपींनाही फरार घोषित करण्याचे आदेश देण्याची मागणी अर्जातून न्यायालयाकडे करण्यात आली होती. अजामीनपात्र वॉरंट जारी करूनही आरोपी अद्याप तपासयंत्रणेसमोर आलेले नाहीत. ते बेपत्ता असल्याचे तपासातून समोर आले आहे.
Join Our WhatsApp Community