ओमायक्रॉन विषाणूच्या प्रसाराने पुन्हा मुंबईतील कोरोनाच्या रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. बुधवारी आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आता मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या १ हजार २ वर गेली आहे.
( हेही वाचा : पेंच टायगर व्याघ्र प्रकल्पात रात्रीची सफारी सुरु पण… )
आरोग्य विभागाने केले आवाहन
बुधवारच्या नोंदीत राज्यात नवे ३०७ कोरोनाचे रुग्ण आढळले. त्यापैकी १९४ रुग्ण मुंबईत आढळले. राज्यभरात कोरोनावर उपचार घेणा-या २५२ रुग्णांना आज डिस्चार्ज दिला गेला. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आताही ९८.१० टक्क्यांवर असल्याने काळजी करण्याचे कारण नसल्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
राज्यात सध्या सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या १ हजार ६०५ वर पोहोचली आहे. राज्यात कोरोनाच्या आगमनकाळापासून ८ कोटी ६ लाख २० हजार ४८८ नमुन्यांची तपासणी केली गेली. त्यापैकी केवळ ७८ लाख ८१ हजार ५४२ रुग्णांमध्ये कोरोना विषाणू आढळला. राज्यात कोरोनाचे पॉझिटीव्हिटी प्रमाण केवळ ९.७८ टक्केच असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.