मुंबईतील लालबाग परिसरात मंगळवारी खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेत एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये 53 वर्षीय महिलेचा मृतदेह प्लास्टिकच्या बॅगमध्ये सापडला. काळाचौकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास काळाचौकी पोलीस करत आहेत.
मृत महिलेची मुलगी ताब्यात
परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला लालबागच्या इब्राहिम कासिम इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहत होती. ही महिला बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या भावाने आणि भाच्याने मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास काळाचौकी पोलीस स्टेनशमध्ये नोंदवली होती. तक्रार मिळाल्यानंतर पोलीस अधिकारी इमारतीत आले. त्यावेळी घरात शोध घेताना महिलेचा मृतदेह एका प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळला होता आणि तो सडलेल्या अवस्थेत होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपासणीसाठी पाठवला आहे. तसेच महिलेच्या मृत्यूच्या कारणाचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी मृत महिलेच्या मुलीला ताब्यात घेतले असून तिची चौकशी केली जात आहे.
( हेही वाचा: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची राज्य सरकारी कर्मचारी संपातून माघार )