दाऊद गँगचे आजी-माजी सदस्य गुन्हे शाखेच्या रडारवर! यादीत ‘इतक्या’ जणांचा समावेश

हे सदस्य कोणाला भेटतात, कुणाच्या संपर्कात आहेत, यावर बारीक लक्ष ठेऊन ही माहिती मिळवली जात आहे.

दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या अतिरेक्याचे कनेक्शन अंडरवर्ल्डशी असल्याचे आढळल्यानंतर मुंबई गुन्हे शाखा सतर्क झाली आहे. गुन्हे शाखेच्या रडारवर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम टोळीचे आजी-माजी सदस्य आले आहेत. गुन्हे शाखेने दाऊदच्या आजी-माजी अशा ५०० गुंडांची यादी तयार केली असून, या गुंडांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.

समोर आले दाऊद कनेक्शन

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दिल्ली आणि उत्तर प्रदेशातून ६ अतिरेक्यांना अटक केली. या अतिरेक्यांचे कनेक्शन थेट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिम याच्याशी असल्याचे समोर आले. या अतिरेक्यांपैकी जान मोहम्मद उर्फ समीर कालिया हा मुंबईतील धारावीत राहणारा आहे. त्याचे थेट संबंध अंडरवर्ल्डसोबत असल्याचे उघडकीस आले. दरम्यान महाराष्ट्र एटीएसने जोगेश्वरी आणि मुंब्रा येथून जान मोहम्मदच्या संपर्कात असणाऱ्या दोघांना अटक केली होती.

(हेही वाचाः ‘या’ कामासाठी गेला होता जान मोहम्मद दुबईला!)

५०० जणांवर वॉच

पाकिस्तान स्थित आयएसआयचं थेट कनेक्शन अंडरवर्ल्डसोबत असल्याचे समोर येताच, मुंबई गुन्हे शाखेने अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या टोळीची मुंबईतील पायेमुळे खणायला सुरुवात केली आहे. गुन्हे शाखेने दाऊद टोळीच्या आजी-माजी सदस्यांच्या यादीत जवळपास ५०० जणांचा समावेश आहे. या सदस्यांच्या हालचालींवर गुन्हे शाखा लक्ष ठेवून आहे. हे सदस्य कोणाला भेटतात, कुणाच्या संपर्कात आहेत, यावर बारीक लक्ष ठेऊन ही माहिती मिळवली जात आहे.

(हेही वाचाः जान मोहम्मदच्या वरच्या खोलीचे काय आहे रहस्य?)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here