झोमॅटो आणि वादाचे जुने नाते आहे. याआधीही अनेकदा झोमॅटो कंपनी वादाच्या भोव-यात सापडली आहे. आता तर झोमॅटोने खुनाच्या आरोपात शिक्षा भोगून आलेल्या आणि चोरीचा गुन्हा दाखल असलेल्या गुन्हेगाराला त्याची पार्श्वभूमी न तपासता नोकरी दिली. या गुन्हेगाराला डिलीव्हरी बाॅयची नोकरी देताना झोमॅटोने त्याची पार्श्वभूमी तपासली नव्हती. या गुन्हेगाराने अन्य एका कंपनीच्या डिलिव्हरी बाॅयची बॅग लंपास केली आणि पळ काढला. कुरार पोलिसांनी याप्रकरणी तपास करत मनिष प्रसाद नरसिंग गौड याला अटक केली. यावेळी हा प्रकार उघडकीस आला.
बॅग केली लंपास
मालाड पुर्वच्या तानाजीनगरमध्ये राहणा-या डिलिव्हरी बाॅय विकास सोनी यांनी तक्रार केली आहे. ऑफिसमधून डिलिव्हरी करण्याचे साहित्य घेऊन ते निघाले. सामान जास्त असल्याने त्यांनी दोन बॅग बनवल्या आणि एक बॅग मागे आणि एक पुढे पायाखाली ठेवली. ते पार्सल द्यायला गेले असता परत आल्यावर बॅग गायब होती.
( हेही वाचा: गुढीपाडव्याच्या दिवशी राज्याला मिळणार ‘ही’ खूशखबर! काय म्हणाले आरोग्यमंत्री? )
चोर अटकेत
तक्रारदाराच्या तक्रारीनंतर वरिष्ठ पोलीस निरिक्षक सतीश गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु केला. सोसायटीचे सीसीटीव्ही पडताळले असता, निळ्या रंगाच्या दुचाकीवर लाल रंगाची बॅग दिसली. चौकशीत आरोपी गौड हा रिझवी ओकमध्ये पार्सल डिलिव्हरी करुन आल्याचे समजले. त्यावरुन त्याला पोलिसांनी चारकोप गणेशनगरच्या राम रहीम चाळीतून अटक केली. तसेच चोरीला गेलेली बॅगही त्याच्याकडून हस्तगत करण्यात आली.
Join Our WhatsApp Community