मुंबईत गेल्या आठवडाभर कोरोना रुग्णांची संख्या दर दिवसाला नऊशेपर्यंत पोहोचत होती परंतु मुंबईत मंगळवारी १ हजार २४२ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. राज्यात १ हजार ८८१ रुग्ण सापडलेले असताना त्यातील ७० टक्के रुग्ण केवळ मुंबईतच सापडल्याने मुंबईत कडक निर्बंध लागण्याची दाट शक्यता आहे.
( हेही वाचा : राज्यात एका दिवसांत दीड हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण)
कोरोना रुग्णसंख्या वाढली
मुंबईत रुग्णसंख्या वाढत असली तरीही ९५ टक्के रुग्ण लक्षणेविरहित असल्याची माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त डॉ संजीवकुमार यांनी दिली. दर दिवसाला किमान ४० रुग्णांना रुग्णालयात दाखल करुन उपचार दिले जात असल्याचेही ते म्हणाले. रुग्णांना प्रामुख्याने पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांत तसेच मरोळ येथील सेव्हन हिल्स येथे दाखल करुन उपचार दिले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईत आता ५ हजार ९७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
Join Our WhatsApp Community