मुंबईकरांनो माहीत आहे का? तुम्ही ‘इतके’ तास ट्रॅफिकमध्ये अडकताय…

मग रेड सिग्नल पाहून मुंबईकर ‘लालबुंद’ का होणार नाही?

147

मुंबई आणि मुंबईतलं ट्रॅफिक हे वर्षानुवर्ष चालत आलेलं समीकरण आहे. मुंबईतल्या रस्त्यांवर असलेल्या गाड्यांच्या गर्दीने अनेकदा मुंबईकरांचं ब्लड प्रेशर हाय केलं आहे, त्यांच्या कपाळावर आठ्या आणल्या आहेत. पण त्यांचं असं वागणं हे नक्कीच रास्त आहे.

पुलंनी म्हटल्याप्रमाणे मुंबईकराचं घड्याळ हे त्याच्या हाताला नाही तर नशिबाला बांधलेलं आहे. मुंबईकरासाठी प्रत्येक मिनिटंही अत्यंत मौल्यवान आहे. पण मुंबईत प्रत्येकाचे वर्षातील 121 तास हे ट्रॅफिकमध्ये अडकण्यात जात आहेत. मग रेड सिग्नल पाहून मुंबईकर ‘लालबुंद’ का होणार नाही? टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सने दिलेल्या आकडेवारीवरुन जगातील सर्वाधिक ट्रॅफिक असलेल्या शहरांमध्ये मुंबई 5व्या स्थानावर आहे. मुंबई सोबतच दिल्ली, बंगळूर आणि पुणे ही शहरं सुद्धा या यादीत आहेत.

1

असे आहे मुंबईतील ट्रॅफिक जाम

टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सकडून 2021 मध्ये जगात सर्वाधिक ट्रॅफिक असलेल्या शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत मुंबई हे भारतातील पहिल्या तर जगातील पाचव्या क्रमांकाचे सर्वाधिक ट्रॅफिक असणारे शहर ठरले आहे. मुंबईत एकूण 53 टक्के वाहतूक कोंडीची नोंद झाली आहे. कोविड लॉकडाऊनमुळे 2019 च्या तुलनेत मुंबईतल्या वाहतूक कोंडीत 12 टक्के घट झाली आहे. 2019 मध्ये मुंबईत 65 टक्के ट्रॅफिक जामजची नोंद झाली होती. सर्वाधिक गर्दी असलेल्या सकाळच्या वेळी ट्रॅफिकमध्ये 29 टक्के तर संध्याकाळच्या वेळी 23 टक्के घट झाली आहे. पण तरीही मुंबई सर्वाधिक ट्रॅफिक असलेल्या शहरांमध्ये गणले जाते.

Untitled

पुणेकरांच्या डोक्याची कटकट झाली कमी

पुण्यातील ट्रॅफिक जाममध्ये 2019 च्या तुलनेत चांगलीच घट झाली आहे. पुणे शहराने या यादीत मागील वर्षीच्या 16व्या स्थानावरुन 21व्या स्थानावर उडी मारली आहे. पुण्यातील ट्रॅफिकमध्ये सरासरी 29 टक्क्यांनी घट झाली असून, सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळांत अनुक्रमे 46 आणि 37 टक्क्यांनी घट झाल्याचे या इंडेक्समध्ये म्हटले आहे.

3

राजधानीत अशी आहे गर्दी

2021 मध्ये जागतिक महानगरांमध्ये गर्दीच्या बाबतीत दिल्लीचा 11वा क्रमांक आल्याने राजधानी दिल्लीतील गर्दी कमी झाल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र 2020 च्या तुलनेत दिल्लीतल्या ट्रॅफिकमध्ये 1 टक्क्याने वाढ झाली आहे. 2019 मध्ये 56 टक्के असलेली दिल्लीतील वाहतूक कोंडी 2020 मध्ये 47 टक्के झाली होती.च ती 2021 मध्ये वाढत 48 टक्के झाली आहे.

4

बंगळूरमध्ये कमी झाली गाड्यांची गर्दी

बंगळूरमध्ये 2019 च्या तुलनेत वाहतूक कोंडीत 23 टक्के घट झाली आहे. यामुळे बंगळूरने या यादीत 6व्या स्थानावरुन थेट 10व्या स्थानावर उडी मारली आहे.

2

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.