कुर्ला परिसरातील कपड्याच्या गोदामांना मोठी आग

178

मुंबईच्या कुर्ल्यामधील एलबीएस मार्गावरती गुलाब शहा इस्टेटमधील गोदामांना मोठी आग लागली. शुक्रवारी सकाळी ही आग लागली. कपड्याच्या पाच ते सहा गोडाऊनला आग लागल्याची माहिती आहे. ही आग तळमजल्यावर असलेल्या 4 ते 5 गाळ्यांमध्ये पसरली, तसेच वरच्या एक मजल्यावरदेखील आग पसरल्याचे वृत्त आहे. काही तासांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले आहे. मात्र, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

( हेही वाचा: तीन दिवसानंतर मुंबईकरांनी घेतला मोकळा श्वास, फटाक्यांचे प्रमाण कमी झाल्याने हवेचा दर्जा सुधारला )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.