मुंबईत भायखळा परिसरात भीषण अग्नितांडव! 8-10 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

भायखळा परिसरातील सप्तश्री मार्गावरील मुस्तफा बाजार परिसरातील लाकडाच्या वखारीत आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ही भीषण आग लेवल 2 स्वरुपाची होती. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. याठिकाणी घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान तैनात झाले असून 8 ते 10 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.

मुस्तफा बाजार परिसरातील वखारीला आग

भायखळा परिसरात मोठ्या प्रमाणात वखारीचं मार्केट आहे. काही वर्षापूर्वी देखील भायखळा परिसरात आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. मुस्तफा बाजार परिसरातील वखारीला आग लागल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. आग लागल्या लागल्या कुलिंग ऑपरेशन सुरु करण्यात आले होते.

(हेही वाचा-मुंबई पोलीस दलात कोरोनाचं थैमान, अनेक बड्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी बाधित)

अग्निशमन दलानं आगीवर मिळवलं नियंत्रण

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील भायखळा परिसरातील मुस्तफा बाजार परिसररातील लाकडाच्या गोडाऊनला आग सकाळच्या दरम्यान लागली. ही आग लेव्हल 2 स्वरुपाची असून या आगीमध्ये नेमकं किती नुकसान झालं आणि यामध्ये जीवितहानी झाली की नाही याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं आहे

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here