मुंबईतील वन अविघ्न इमारतीच्या 22 व्या मजल्याला भीषण आग लागली आहे. आगीचे प्रचंड लोट येत असल्याने परिसरात घबराट पसरली आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. शर्थींच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. अद्याप आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. गेल्या वर्षी याच इमारतीला भीषण आग लागली होती. त्यामुळे पुन्हा आग लागल्याने वर्षभरात कोणतीच उपाययोजना, खबरदारी घेतली गेली नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
( हेही वाचा: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त नरेंद्र मोदींसह ‘या’ नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली )
#मुंबई | मुंबईतील लोअर परळ भागातील #अविघ्न_पार्क इमारतीला भीषण आग pic.twitter.com/P8eeQ9hpuA
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) December 15, 2022
वन अविघ्न पार्क ही मुंबईतील लालबाग परिसरातील टोलेजंग इमारत आहे. ही इमारत एकूण 60 मजल्यांची आहे. तर इमारतीच्या आजूबाजूला इतर लहान- मोठ्या इमारतीही आहेत. त्याशिवाय अनेक बैठी घरे, चाळीही आहेत. गुरुवारी सकाळी 11 च्या दरम्यान इमारतीच्या 22 व्या मजल्यावर आग लागली.
वर्षभरापूर्वी याच इमारतीला लागली होती आग
मुंबईतील लालबागमधील वन अविघ्न पार्क इमारतीला वर्षभरापूर्वीच आग लागली होती. त्यावेळी लागलेली आग खूपच भीषण होती. एका नागरिकाने आपला जीव वाचवण्यासाठी इमारतीवरुन उडी मारली होती, त्यात त्याला आपला जीव गमवावा लागला होता.
Join Our WhatsApp Community