कुर्ल्यातील इमारतीला भीषण आग; एका महिलेचा मृत्यू

183

मुंबईत पुन्हा एकदा आग लागल्याची घटना समोर आली आहे. कुर्ला परिसरातील एका इमारतीला भीषण आग लागली आहे. आगीने भीषण रौद्ररुप धारण केले असून, 6 मजल्यांपर्यंत आग पसरली आहे. या आगीत एका महिलेचा मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे. सध्या आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास कुर्ल्यातील एका इमारतीला भीषण आग लागली. या आगीने काही क्षणातच रौद्ररुप धारण केले. लागलेल्या भीषण आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ही आग लागली होती. या भीषण आगीत एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून, आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

( हेही वाचा: वरळीमध्ये फोर सिझन्स हॉटेलच्या निर्माणाधीन इमारतीखाली अपघात; 2 कामगार ठार )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.