वांद्रे लिंकिंग रोड येथे भुमाफियाकडून हवेत गोळीबार

139
वांद्रे पश्चिमेतील लिंकिंग रोडवरील गॅझेबो मार्केटमध्ये गुरुवारी रात्री दुचाकीवरून आलेल्या तिघांनी तीन राऊंड हवेत गोळीबार  करून परिसरात फेरीवाल्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली. खार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. सुदैवाने यात कुणी जखमी झाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दुचाकीस्वारांनी टॉय गनमधून गोळीबार केल्याचा पोलिसांना संशय असून,  एका होर्डिंगवर गोळी झाडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.  पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लिंकिंग रोड येथे रात्री ८  वाजता ही घटना घडली. या गोळीबारामागे भूमाफियांचा हात असल्याचा संशय पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे.  माफियांना ही जागा हडप करून या ठिकाणी अवैध फेरीवाले बसवायचे आहेत, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिस सूत्रांनी सांगितले की, हे तिघे काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आले आणि त्यांनी हवेत दोन आणि एका होर्डिंगवर गोळीबार केला.  गोळीबार केल्यानंतर आरोपींनी काही फेरीवाल्यांना धमकावून घटनास्थळी स्टॉल न लावण्याची धमकी दिली.

( हेही वाचा: तीन दिवसांत चंद्रपूरात दुस-यांदा वाघाच्या हल्ल्यात माणसाचा बळी )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.