मुंबईतील Gazebo शॉपिंग सेंटरजवळ हवेत गोळीबार! एकाला अटक, तिघांचा शोध सुरू

106

मुंबईतील खार पीएस या परिसरात गुरूवारी रात्री साडे 8 च्या सुमारास गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खारच्या लिंकिंग रोडवरील गॅझेबो शॉपिंग सेंटरच्या फलकावर अज्ञात व्यक्तींनी हवेत गोळीबार केला आहे. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही तर या घटनेचा तपास सुरू आहे. हवेत गोळीबार करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली असून तिघांचा शोध अद्याप सुरू आहे.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथक 9 ने हवेत गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. या अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव शरीक शेख असे असल्याचे सांगितले जात आहे. तर खंडणी उकळण्यासाठी आणि फेरीवाल्यांना धमकवण्यासाठी आरोपीने हा गोळीबार केला आहे.

(हेही वाचा – गर्भवतीला वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध न झाल्याने जुळ्या बाळांचा मृत्यू!)

दरम्यान, 11 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास खारच्या लिंकिंग रोडवरील गॅझेबो शॉपिंग सेंटरच्या फलकावर आरोपीने हवेत गोळीबार केला होता. याप्रकऱणी एक आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली असून गुन्ह्यात वापरलेली ऍक्टिव्हा गाडी जप्त करण्यात आली आहे. तर गुन्हे शाखेच्या पथकाकडून आणखी तीन आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.