परळच्या ग्लोबल रुग्णालयात अवयव प्रत्यरोपणात अतिशय गुंतागुंतीची समजली जाणारी स्वादुपिंड आणि मूत्रपिंड प्रत्यरोपणाची शस्त्रक्रिया नुकतीच पार पडली. एकाचवेळी रुग्णाला मृत रुग्णाकडून स्वादुपिंड आणि मूत्रपिंड मिळाल्याने या नव्या अवयवांसह रुग्णाला नव्याने जगण्याची संधी मिळाली आहे.
शरीरात जन्मताच इन्सुलिनचे प्रमाण कमी असलेल्या रुग्णांना पहिल्या प्रकारातील मधुमेह होतो. याबाबत लहानपणीच निदान केले जाते. या रुग्णांना इन्सुलिनचे इंजेक्शन देत मधुमेह नियंत्रणात ठेवले जाते. मात्र संबंधित रुग्णाला मधुमेहाच्या पहिल्या प्रकाराचे निदान वयाची विशी गठताना झाले. परिणामी, त्याचे एक मूत्रपिंड निकामी झाले. इतर शारीरिक तपासणीदरम्यान रुग्णाचे स्वादुपिंडही निकामी झाल्याचे समजले. रुग्णाला वाचवण्यासाठी स्वादुपिंड आणि मूत्रपिंड प्रत्यरोपणाची शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. अखेर काही दिवसांपूर्वी एकाच रुग्णाकडून अवयव प्रत्यरोपणासाठी प्रतीक्षायादीत असलेल्या रुग्णाला दोन्ही अवयव मिळाले. ग्लोबल रुग्णालयाच्या डॉक्टरांनी तातडीने रुग्णाला प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या माध्यमातून एकाचवेळी त्याच्या शरीरात नवे स्वादूपिंड आणि मूत्रपिंड प्रत्यारोपीत केले.
( हेही वाचा: ‘हिंमत असेल तर मुंबईत मराठी माणूस किती उरलाय हे जाहीर करा’, मुख्यमंत्र्यांचे ठाकरेंना ‘रोखठोक’ आव्हान )
या शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाला व्हेन्टीलेटरवर ठेवले जाते. कित्येकदा शस्त्रक्रिया सहा तासांहून अधिक काळ चालते. संबंधित रुग्णाला उच्च रक्तदाब आणि थायरॉईडचा त्रास असल्याने डॉक्टरांसाठी अवयव प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया आव्हानात्मक होती. रुग्णाची प्रकृती आता स्थिर असून, प्रकृतीत सुधारणा दिसून आल्यानंतर डिस्चार्ज दिला जाईल.
Join Our WhatsApp Community