परशुराम घाटात कोसळली दरड; मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीत बदल

190

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात शनिवारी रात्री अकराच्या सुमारास दरड कोसळली. दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. यानंतर महामार्गावरील दरड हटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या तीन ते चार दिवस रत्नागिरी व रायगड जिल्हयात जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे शनिवारी उशिरा परशुराम घाटात दरड कोसळली. रात्री साडे बारा वाजता महामार्गावरील दरड, माती हटवण्याचे काम सुरू करण्यात आले.

वाहतूक पर्यायी मार्गे वळवली

मिळालेल्या माहितीनुसार, या घाटातील दरडींमुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही हानी झाली नाही. दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील दोन्ही बाजूकडील वाहने शनिवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास सोडण्यात आली. तर सध्या परशुराम घाटातील वाहतूकीचा मार्ग बदलण्यात आला असून चिरणी मार्गे वळवण्यात आला आहे. दरड कोसळल्याने मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूकीस मोठा अडथळा निर्माण झाल्याने महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली असून चिरणी-आंबडस या पर्यायी मार्गे वळवल्याने वाहतूक सुरू झाली असली तरी या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले.

(हेही वाचा – माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांना धक्का, शिवसेनेतून हकालपट्टी!)

परशुराम घाट महामार्गावरील चौपरीकरणाचे काम करण्यासाठी २५ एप्रिल २०२२ ते २५ मे २०२२ दरम्यान या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. यावेळी या महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. वाहतूक बंदीच्या कालावधीत फक्त कमी वजनाची वाहतूक आमडस – चिरणी- लोटे रस्ता कळंबस्ते- आमडस – धामणंद या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. पावसाळ्यापूर्वी होणाऱ्या चौपरीकरणाच्या कामामध्ये कोणताही अडथळा येऊ नये म्हणून या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.