मुंबई- गोवा हायवेवरील पेणनजीक संशयास्पद आढळून आलेली वस्तू ही डमी बाॅम्ब असल्याचे निष्पन्न झाले आहे. सुमारे चार तासांच्या प्रयत्नानंतर संशयास्पद बाॅम्ब निकामी करण्यात आला. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास जिलेटिन सदृश्य वस्तू सापडल्या होत्या. दरम्यान, नवी मुंबई आणि रायगडच्या बाॅम्ब शोध पथकाच्या मदतीने हा बाॅम्ब निकामी करण्यात यश मिळाले आहे.
मुंबई- गोवा हायवेवरील पेणनजीक संशयास्पद वस्तू आढळली होती. भोगावती नदीच्या पुलाच्या खालच्या बाजूला जिलेटीन सदृश्य कांड्या सापडल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. गुरुवारी सायंकाळी भोगावती नदीपात्रात गेलेल्या व्यक्तीला पाण्यामध्ये संशयास्पद वस्तू दिसली होती.
( हेही वाचा: मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ‘२७ तासांचा’ मेगाब्लॉक; अनेक गाड्या रद्द, एक्स्प्रेसचे वेळापत्रक बदलले )
संशयास्पद आढळून आलेली वस्तू ही डमी बाॅम्ब
पेण पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. त्याशिवाय रायगड पोलीस अधीक्षक, खालापूर, रोहा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्याशिवाय मुंबई आणि रायगड येथील बाॅम्ब शोधक पथकालाही पाचारण करण्यात आले होते. अखेर संशयास्पद आढळून आलेली वस्तू ही डमी बाॅम्ब असल्याचे निष्पन्न झाले आहे.
Join Our WhatsApp Community