Mumbai-Goa Highway: मुंबई- गोवा महामार्गावर भीषण अपघात; 14 जण जखमी

मुंबई- गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील हमरापूर फाटा ब्रीजवर हा अपघात झाला. या अपघातामध्ये 14 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. टेम्पो ट्रॅव्हलर व ट्रेलरमध्ये हा अपघात झाला. टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये एकूण 22 प्रवासी होते, 22 प्रवाशांपैकी एकूण 14 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांवर पेणच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पहाटे दोन वाजता झाला अपघात

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात मुंबई- गोवा महामार्गावर हमरापूर फाटा ब्रीजवर गुरुवारी पहाटे दोन वाजता अपघात झाला. टेम्पो ट्रॅव्हलर आणि ट्रेलरमध्ये हा अपघात झाला. टेम्पो ट्रॅव्हलर खेडवरुन मुंबईकडे जात असताना, हमरापूर ब्रीजवर बंद पडलेल्या काॅईल ट्रेलरला मागून धडकले. या अपघातामध्ये एकूण 14 जण जखमी झाले आहेत. जखमी लोकांना रुग्णवाहिकेतून तातडीने पेणच्या उपजिलि्हा रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

( हेही वाचा: शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याची परवानगी कोणालाच मिळणार नाही, ‘या’ भाजप मंत्र्यांचा दावा )

जखमींची नावे

चालक सागर दिलीप गुरव वय 31, प्रतिभा महेश देवळे वय 30, रंजना दीपक भुवड वय 25, मीनल काशिनाथ देवळे वय 25, काशिनाथ पांडुरंग देवळे वय 50, सुरेश सखाराम नाचरे वय 40, प्रवीण काशिनाथ नाचरे वय 34, मंगेश मधुकर देवळे वय 41, स्वप्निल काशिनाथ देवेळे वय 47, संजना संजय पाटील वय 34, समृद्धी संजय पाटील वय 14, दीपक गंगाराम भुवड वय 30, श्वेता सुनील भुवड वय 35, संजना सुरेश नाचरे वय 35, अशी या अपघातामध्ये जखमी झालेल्यांची नावे आहेत. जखमींवर सध्या पेणच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here