चौपदरीकरण झालेला मुंबई-गोवा महामार्ग पहिल्या पावसात दुभंगला! कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

149
२०११ सालीपासून ४७१ किमीच्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु झाले. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांना जोडणाऱ्या या महामार्गाचे काम सध्या ७० टक्क्यांहून अधिक झाल्याची माहिती मिळत आहे. आधी रायगड जिल्ह्यातील पनवेल ते इंदापूर या दरम्यान या महामार्गाचे काम रखडले होते. त्यानंतर कालपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यामधील चिपळूण तालुक्यातील या महामार्गाचे काम रखडले. आता मे २०२३ मध्ये या महामार्गाचे काम पूर्ण होईल, अशी शक्यता आहे. मात्र त्याआधीच आता या महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना घडली आहे.

सिमेंटच्या रस्त्याला मोठी भेग  

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम आता जवळपास पूर्णत्वाच्या दिशेने आले आहे. चिपळूण येथील परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम बरेच अडचणीचे होते, त्यासाठी मागील महिनाभर हा घाट बंद करण्यात आला होता. अशा प्रकारे आता या महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होणार असतानाच आता या महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना उघडकीस आली आहे. सध्या कोकणात पावसाने जोर धरला आहे. मागील दोन दिवसांत या कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. त्याचा फटका आता मुंबई-गोवा महामार्गाला बसला आहे. कारण मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणजवळ कामथे घाटात रस्त्याला मोठी भेग पडली आहे. सिमेंट काँक्रिटच्या महामार्गावर उभी भेग पडली आहे. त्यामुळे  या ठिकाणी वाहतूक थांबविण्यात आली आहे.

१७ हजार कोटींचा प्रकल्प 

या घटनेमुळे मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील विशेषतः चिपळूण तालुक्यातील महार्गाच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या महामार्गाच्या बांधकामाचा दर्जा ठेवला नाही का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. त्यामुळे या महामार्गाचे बांधकाम इतक्या वेगाने पूर्ण होत आहे, तितके त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी सुमारे १७ हजार कोटी रुपयांचा तरतूद करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.