मुंबईत हार्बर रेल्वे मार्गावर मंगळवारी प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. मुंबईत आज सकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्याने लोकल वाहतुकीवर परिणाम झाला. अशातच हार्बर मार्गावर पेंटाग्राफमध्ये स्पार्क झाल्याचे समोर आले. मिळालेल्या माहितीनुसार, पेंटाग्राफमधील स्पार्कमुळे हार्बर लोकलची वाहतूक १५ ते २० मिनिटं उशिराने धावत होती. पावसाच्या सरींमुळे शॉर्टसर्किट झाल्याने हार्बर रेल्वेमार्गावरील वीजपुरवठा खंडित झाल्याने तेथील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र सकाळी ९.२६ वाजता या मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आल्याची माहिती रेल्वे कडून देण्यात आली आहे.
(हेही वाचा – पावसाळ्यात घाट विभागांवर लक्ष ठेवण्यासाठी मध्य रेल्वे २४ तास कार्यरत! )
UP Harbor line, Sandhurst Road- Overhead wire power was not holding from 9.13am.
The same has been restored at 9.26am.
— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) May 24, 2022
हार्बर मार्गावरील या तांत्रिक अडचणीमुळे कामाला जाण्याच्या वेळी हार्बर रेल्वे ठप्प झाल्याने अनेक प्रवाशांचा खोळंबा झाल्याचे पाहायला मिळाले. ऑफिसला वेळेत पोहोचण्याच्या धावपळीत ही समस्या आल्याने प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मुंबईसह उपनगरात गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या सरी बरसत आहे. त्यामुळे ओव्हरहेड व्हायर्सवरील पेंटाग्राममध्ये स्पार्क झाल्याने वीजपुरवठा खंडीत झाला होता. त्यानंतर काही काळासाठी हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अनेक ट्रेन जागच्या जागीच थांबून होत्या मात्र काही काळानंतर वीजपुरवठा सुरळीत झाल्याने ही वाहतूक पूर्ववत झाली.
Join Our WhatsApp Community