मुंबईत पावसाचा धुमाकूळ! 

मुंबईत पावसाचा जोर पुन्हा वाढताच सखल भागात पावसाचे पाणी साचू लागले आणि जनजीवन विस्कळीत झाले. समुद्राला भरती असल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा न होता पाणी रस्त्यांवर तुंबले.

शनिवारी, १२ जून रोजी सकाळपासूनच मुंबईत विजेच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मुंबईकरांची आजची सकाळ ही आकाशातील अलार्मने झाली. सकाळपासून मुंबईत पावसाचा जोर सुरु होता. मागील २४ तासांत मुंबई शहरात  ८९.३० मिमी आणि मुंबई  उपनगरात ७९.६६ मिमी पावसाची नोंद झाली. मुंबईत पावसाचा जोर पुन्हा वाढताच सखल भागात पावसाचे पाणी साचू लागले आणि जनजीवन विस्कळीत झाले. समुद्राला भरती असल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा न होता पाणी रस्त्यांवर तुंबले.

किंग्ज सर्कलमध्ये रस्त्यांना नद्यांचे स्वरूप! 

सायन-किंग्ज सर्कल या भागात नेहमीप्रमाणे पावसाचे पाणी साचून येथील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले. इथे रस्त्यावर गाड्या बंद पडल्या. त्यामुळे अनेकांची गैरसोय झाली. वाहन चालकांना गुडघाभर पाण्यातून ढकलत ढकलत वाहने बाहेर काढावी लागली.

(हेही वाचा : आता पीएफआयचा देशविघातक चेहरा होतोय उघड!)

सांताक्रूझ येथे मिठी नदी रस्त्यावर अवतरली! 

सांताक्रूझ येथे मिठी नदी ही दुतोंडी वाहू लागली. त्यामुळे ते पाणी थेट येथील रस्त्यावर येऊन वाहू लागले. हे पाणी दुकानांमध्ये शिरून दुकानदारांचे मोठे नुकसान झाले.

हिंदमाता परिसर पुन्हा पाण्याखाली! 

हिंदमाता परिसरात वर्षानुवर्षे पावसाचे पाणी साचत असते. त्यावर अद्याप महापालिकेला कायमस्वरूपी उपाय काढता आलेला नाही. या भागात पावसाच्या पाण्याने रस्ते पाण्याखाली गेले. त्यामुळे इथे वाहतूक कोंडी झाली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here