अनिल अंबानींना करचुकवेगिरी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा!

121

मुंबई उच्च न्यायालयाने रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांना 420 कोटी रुपयांच्या करचुकवेगिरी प्रकरणी मोठा दिलासा दिला आहे. १७ नोव्हेंबरपर्यंत अनिल अंबानी यांच्यावर कठोर कारवाई करू नये, असे उच्च न्यायालयाने आयकर विभागाला सांगितले आहे.

( हेही वाचा : अंबरनाथमध्ये विद्यार्थ्यांची स्कूल बस उलटली; घटनेचा व्हिडिओ व्हायरल)

रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्यावर काळा पैसा कायद्यांतर्गत खटला चालवण्याची मागणी करणाऱ्या कारणे दाखवा नोटीसवर 17 नोव्हेंबरपर्यंत कोणतीही सक्तीची कारवाई करू नये, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी प्राप्तिकर विभागाला दिले.

8 ऑगस्ट 2022 रोजी, आयकर विभागाने अंबानींना दोन स्विस बँक खात्यांमध्ये ठेवलेल्या 814 कोटींहून अधिक अघोषित पैशांवर 420 कोटी रुपयांचा कर चुकवल्याबद्दल नोटीस बजावली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.