… म्हणून मुंबई विमानतळ राहणार ६ तासांसाठी बंद!

84

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानाच्या दोन्ही धावपट्या आज 10 मे रोजी तब्बल सहा तासांसाठी बंद ठेवल्या जाणार आहेत. या दरम्यान, एकही विमान उड्डाण होणार नसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे जवळपास 120 हून अधिक विमानाच्या फेऱ्यांवर परिणाम होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या सहा तासांमध्ये देखभाल- दुरुस्तीची कामे केली जाणार आहे. या कामांमुळे विविध कंपन्यांच्या काही विमान सेवा रद्द, तर काहींच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना मनस्तापही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(हेही वाचा – Sri Lanka Crisis: पंतप्रधानांसह अनेक मंत्र्यांची घरं आंदोलकांनी पेटवली! खासदारासह ५ ठार, शेकडो जखमी)

कोणत्या वेळात राहणार विमान सेवा बंद?

मान्सूनपूर्व देखभाल आणि दुरुस्ती करण्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 10 मे रोजी सहा तासांसाठी सर्व उड्डाणांसाठी बंद राहील, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. या उद्देशासाठी, दोन्ही रनवे, RWYs 14/32 आणि 09/27, आज 10 मे रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 दरम्यान सर्व फ्लाइट ऑपरेशन्ससाठी बंद राहणार आहेत. मुंबई विमानतळावर RWYs 14/32 आणि 09/27 अशी मुख्य तसेच पर्यायी धावपट्टी आहे.

म्हणून विमानाची धावपट्टी ठेवली जाते बंद?

कोरोना महामारी ओसरल्यानंतर मुंबई विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आले होते. त्यामुळे विमानांच्या फेऱ्या देखील वाढल्या होत्या. त्यानंतर आता पावसाळा तोंडावर आल्याने मान्सूनपूर्व काम आणि धावपट्यांची डागडुजी करणे क्रमप्राप्त आहे. पावसाळय़ात अनेकदा धावपट्टीवर पाणी साचू शकते. यामुळे धावपट्टीवर विमान उतरताना ते घसरण्याचीही शक्यता असते. यामुळे दुर्घटना होण्याचा धोका असतो. खबरदारी म्हणून दरवर्षी पावसाळय़ापूर्वी धावपट्टीच्या देखभाल-दुरुस्तीची कामे विमान प्रशासनाकडून हाती घेण्यात येतात आणि त्यासाठी धावपट्टी बंद ठेवली जात असल्याचे सांगितले जात आहे.

कामे पूर्ण झाल्यानंतर विमान सेवा पुन्हा सुरू

सर्व विमान कंपन्यांना आधीच एक NOTAM  (उड्डाण करण्यापूर्वी वैमानिकांना जारी केलेली लेखी अधिसूचना) जारी करण्यात आली आहे. त्यानुसार, आज संध्याकाळी 5 वाजता दोन धावपट्टीवरील देखभालीची कामे पूर्ण झाल्यानंतर विमान सेवेचे सामान्य कामकाज पुन्हा सुरू होईल. CSMIA ने सर्व प्रवाशांना कोणत्याही गैरसोयी टाळण्यासाठी त्यांच्या संबंधित एअरलाइन्ससह 10 मे च्या फ्लाइटचे वेळापत्रक तपासण्याचा सल्ला दिला आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.