ओशिवरा येथील फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग

मुंबईच्या ओशिवारा येथील फर्निचर मार्केटमधील फर्निचर दुकानांना सोमवारी दुपारी भीषण आग लागली आहे. ही आग काही वेळातच दुकानांजवळील झोपड्यांपर्यंतही पसरली आहे. अग्निशमन दलाच्या 15 गाड्या, 10 पाण्याचे टॅंकर्स घटनास्थळी पोहोचले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे. दरम्यान, आगीत सिलिंडरचे स्फोट होत असल्याचीही माहिती मिळाली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेला नाही. तसेच, कोणतीही जीवितहानी झाल्याचेही वृत्त समोर आलेले नाही.

( हेही वाचा: समृद्धी महामार्गावरील नागपूर-शिर्डी बस सेवा स्थगित; ‘हे’ आहे कारण )

अथक प्रयत्नांनतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

जोगेश्वरीतील ओशिवरा येथे फर्निचरची मोठी बाजारपेठ आहे. या गोदामाला दुपारी मोठी आग लागली. या आगीने काही वेळातच रौद्र रुप धारण केले आणि परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या गाड्या त्वरित घटनास्थळी दाखल झाल्या. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तब्बल 12 ते 14 गाड्यांचा ताफा घटनास्थळावर पोहोचला होता. तब्बल दीड तासांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here