जुहूच्या समुद्रात तीन तरूण बुडाले

समुद्र किनारी फिरण्यासाठी गेलेल्या चार जणांपैकी तिघेजण जुहू चौपाटी येथील समुद्रात बुडाल्याची घटना १४ जूनला मंगळवारी दुपारी घडली. तटरक्षक दलाच्या मदतीने या तिघांचा शोध घेण्याचे काम सुरू होते, मात्र अद्याप कोणाचाही शोध लागलेला नाही अशी माहिती सांताक्रूझ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब तांबे यांनी दिली.

जुहूच्या समुद्रात तीन तरूण बुडाले

प्रथम गणेश गुप्ता (१६),कौस्तुभ गणेश गुप्ता(१८) आणि अमन सिंह (२१)असे बुडालेल्या तिघांची नावे असून अभिषेक शर्मा हा वाचला आहे. हे तिघेही चेंबूर वाशीनाका येथे राहणारे असून यात दोन सख्या भावांचादेखील समावेश आहे. वाशीनाका येथील अमन आशियाना या इमारतीत राहणारे हे चौघे मंगळवारी दुपारी फिरण्यासाठी जुहू चौपाटी येथे आले होते. त्यानंतर चौघेही समुद्रात पोहण्यासाठी गेले.

( हेही वाचा : बोरीवली रेल्वे स्थानक ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला जोडणारा पूलच वादात अडकला )

हे तिघे जण समुद्रात खोलवर गेले मात्र अभिषेक हा किनाऱ्यावर होता, त्याने या तिघांना दूर जाऊ नका असे सूचित देखील केले मात्र ते समुद्राच्या लाटेसह आतपर्यंत गेले. काही वेळाने तिघेही दिसेनासे झाल्यावर अभिषेकने बाहेर येऊन तेथील संबंधित जीवनरक्षकांना कळविले. जीवनरक्षकाने या तिघांचा शोध घेण्यास सुरुवात केली मात्र तिघांचाही शोध लागलेला नाही. घटनास्थळी दाखल झालेल्या सांताक्रूझ पोलिसांनी तटरक्षक दलाची मदत घेऊन हेलिकॉप्टरच्या मदतीने शोध कार्य सुरू ठेवले होते. मात्र उशिरापर्यंत तिघांचाही शोध लागलेला नाही. या तिघांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here