मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वाहतूक कोंडीतून आता लवकरच मुंबईकरांची सुटका होणार आहे. पुढील महिन्यापासून मुंबई मेट्रो 2-अ आणि मेट्रो 7 ट्रॅकवर धावणार आहे. मुंबई मेट्रोचा हा मार्ग दहिसर ते आरे काॅलनी आहे, तर दुसरा टप्पा आरे ते अंधेरी असणार आहे.
म्हणून आतुरतेने वाट
या मार्गांवर धावणाऱ्या मेट्रो गाड्यांची सुरक्षा तपासणी पूर्ण झाली आहे. केवळ मेट्रो ट्रॅकची सुरक्षा तपासणी बाकी आहे. या तपासणीनंतर, मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून सुरक्षा प्रमाणपत्र मिळेल. यानंतर मुंबईकरांसाठी मेट्रो ट्रेन रुळांवर धावू लागतील. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी अवघे काही दिवस लागणार आहेत. यानंतर एप्रिल महिन्यापासून या दोन्ही मार्गांवर मेट्रो धावण्याची शक्यता आहे. या दोन्ही मेट्रो सुरू झाल्यानंतर, वाहतुकीची समस्या 10 ते 15 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. याशिवाय लोकल गाड्यांची गर्दीही बऱ्याच अंशी कमी होणार आहे. त्यामुळेच सर्वसामान्य मुंबईकर या दोन मेट्रोंच्या धावण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
( हेही वाचा: भारतवासियांचे रशियाला समर्थन! ट्विटर ट्रेन्ड होतोय #IStandWithPutin…)
मेट्रो ट्रॅकची सुरक्षा तपासणी बाकी
जानेवारी महिन्यात मेट्रोच्या या दोन्ही मार्गांसाठी ‘रिसर्च डिझाइन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन’ (आरडीएसओ) संबंधित प्रमाणपत्रे जारी करण्यात आली आहेत. ही प्रमाणपत्रे दोन टप्प्यात दिली जातात. त्यांच्या अटींनुसार मेट्रो ट्रेनच्या सुरक्षेसंबंधीची चौकशीही पूर्ण झाली आहे. आता केवळ या दोन्ही मार्गांच्या मेट्रो ट्रॅकची सुरक्षा तपासणी करणे बाकी आहे.