मुंबईत ‘मिनी लॉकडाऊन’ लागणार?, महापौर पेडणेकरांकडून इशारा

मुंबईत २० हजारपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात वीकेंड लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. मुंबईतही शुक्रवारी संध्याकाळपर्यंत निर्बंधांची घोषणा होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनबाबत चर्चा सुरु असताना कोरोनाबाधितांची संख्या २० हजारांच्या पुढे गेल्याने लॉकडाऊन सारखा कठोर निर्णय घेतला जाऊ शकतो. असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले होते. यानंतर खरंच लॉकडाऊन लागणार का अशा चर्चा सध्या होताना दिसताय. त्यावर महापौर पेडणेकर यांनी आज स्पष्टीकरण दिले आहे. सध्यातरी पूर्ण लॉकडाऊन लागू केला जाणार नसून मिनी लॉकडाऊनवर विचार केला जातोय, अशी माहिती पेडणेकर यांनी दिली.

(हेही वाचा – ‘ही’ लक्षणं आहेत तरच गृह विलगीकरणास पालिकेची परवानगी, नवे नियम काय?)

संध्याकाळी ७ पर्यंत निर्णय होण्याची शक्यता

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महानगरपालिका आयुक्तांशी चर्चा करत आहेत, अशी माहिती महापौर पेडणेकरांनी दिली आहे. आज मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील उपस्थित राहणार आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. धोक्याची पातळी ओलांडताना दिसत आहे. त्यामुळे मुंबईतील निर्बंधाबाबत संध्याकाळी ७ वाजेपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निर्णय जाहीर करतील, असेही त्या म्हणाल्यात. तर मुंबईत वाढणाऱ्या बाधितांच्या संख्येमुळे मिनीलॉकडाऊन परवडणारे आहे मात्र वाढती रुग्ण संख्या पाहता निर्बंध कडक करावे लागतील, असेही संकेत पेडणेकर यांनी दिले.

घाबरण्यापेक्षा काळजी घ्या

पुढे महापौर असेही म्हणाल्या, संपूर्ण लॉकडाऊन होणार नाही, पण काही बेजबाबदारपणे वागत राहिले तर येत्या काळात लॉकडाऊन लावण्यात येऊ शकतो. त्यामुळे घाबरण्यापेक्षा काळजी घ्या. ओमायक्रॉन हा गंभीर स्वरूपाचा व्हेरियंट नाही, असे समजू नका असे जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगितले आहे. ओमायक्रॉनला गांभीर्याने घेतलं तर पुढे कठीण परिस्थितीला तोंड द्यावं लागणार नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here