संकल्प आदित्योदयाचा पण विकासाची कामे शिंदे पर्वाच्या उदयासाठी !

मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सन २०२२-२३ चा सत्ताधारी शिवसेना पक्षाचा निवडणूक अर्थसंकल्प सादर करताना सुमारे सात हजार कोटींची वाढ करत ४५ हजार ९४९ पूर्णांक २१ कोटींचा असा ८ पूर्णांक ४३ कोटी रुपये शिलकीचा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प राज्याचे तत्कालिन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासाठी आगामी निवडणुकीचे पुरक वातावरण  बनवताना आदित्योदयाचा संकल्पच मांडला होता. यात ठाकरे यांच्या संकल्पेनतील उपक्रम, योजना आणि विकास कामांसाठी भरीव तरतूद महापालिका आयुक्तांनी केल्या होत्या. परंतु राज्यात सरकार बदलले आणि शिंदे-फडणवीस यांचे आले आणि अर्थसंकल्पातील तरतुदी व्यतिरिक्त विकासकामांना गती देत त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईचा विकास केला जात आहे.

सन २०२१-२२ चा ११.५१ कोटी रुपये शिलकीचा ३९ हजार ०३८ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. परंतु चालू आर्थिक वर्षात म्हणजे सन २०२२-२३ मध्ये ८.४३ कोटी रुपये शिलकीचा ४५४९.२१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडला गेला.  यामध्ये आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी महापलिकेच्या महत्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या  ३१ प्रकल्पांच्या भांडवली कामांसाठी  १७ हजार९४२ कोटींची तरतूद केली.

महापालिकेच्या रुग्णांना प्राथमिक आरोग्य सेवा मिळावी याकरता हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र आपल्या घराशेजारी ही  उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची घोषणा चहल यांनी केली आहे. या उपक्रमासाठी सुमारे ४०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. परंतु या योजनेची अंमलबजावणी शिंदे सरकारने पुढाकार घेऊन केली आणि प्रशासनाशी पाठपुरावा करत हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असे नामकरण करत ६६ ठिकाणी हे दवाखाने सुरु केल्यानंतर मागील आठ ते दहा दिवसांपूर्वी आणखी २० दवाखान्यांचे लोकार्पण देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे राज्यातील तत्कालिन ठाकरे सरकारच्या नावावर ही योजना खपवली जाणार होती, पण ही योजनेची अंमलबजावणी शिंदे सरकारने घेत नागरिकांना घराशेजारी प्रतिबंधात्मक व प्राथमिक उपचार सुविधा उपलब्ध देण्याचा  प्रयत्न केला आहे.

( हेही वाचा: पाकिस्तानला हाकला, आम्हाला वाचवा; POKतील नागरिकांची भारताकडे याचना )

या व्यतिरिक्त रस्त्यांच्या पुनपृष्ठीकरणाच्या कामांसह विद्युत रोषणाई, रंगरंगोटी, स्ट्रीट फर्निचर, शौचालयांचे बांधकाम,भित्तीचित्रे आदींसह १६ कामे एकत्र संकलित करून मुंबई सौदर्यीकरणाची सुमारे १७००कोटी रुपयांची कामे निश्चित केली, ज्यातील ९०० कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे. जी कामे नगरसेवकांच्या निधीतून, विकास  निधींमधून सुचवली जातात, तीच काम सरकारने महापालिका प्रशासनाला विभाग स्तरावर संकलित करून ही सर्व कामे संकलित केली. त्यामुळे  जिथे आर्थिक वर्षात सुमारे ४०० कोटी रुपये खर्च होणे अपेक्षित मानले जातात, तिथे १७०० कोटी म्हणजे पुढील चार वर्षांची कामे शिंदे सरकारने आयुक्त व प्रशासक चहल यांना निर्देश देत हाती घेतली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here