प्रभादेवीत ८५ लाखांची सदनिका! ‘या’ लोकांसाठीच होणार उभारणी

133

मुंबई महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात येणाऱ्या प्रकल्पांमुळे अनेक कुटुंबे बाधित होत आहेत. या कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रत्येक विभागांमध्ये प्रकल्पबाधितांकरता सदनिका बांधण्याचा प्रयत्न महापालिकेच्यावतीने होत आहे. याच अनुषंगाने प्रभादेवीमध्येही ५२९ सदनिकांची बांधणी केली जाणार आहे. एकूण ३३१७ चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा आहे. जमीन आणि बांधकामच्या टिडीआर बदल्यात खासगी विकासकाच्या माध्यमातून या सदनिका बांधून घेतल्या जाणार असून यासाठी प्रत्येक सदनिका मागे ८५ लाख रुपये महापालिका मोजणार आहे. त्यामुळे या ५२९ सदनिकांकरता एकूण ४४९.६५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.

अधिमूल्य थेट महापालिकेच्या तिजोरीमधून दिले जाणार

प्रभादेवी येथील राजाभाई देसाई रस्ता व सदानंद हसू तांडेल या नजिकच्या भूखंडावर एसआरए योजनेतंर्गत पुनर्विकास प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून येथील नगर भू क्रमांक १०७४ हा खूला असून विकासकाच्या ताब्यात आहे. हा भूखंड स्वातंत्र्यवीर सावरकर या मुख्य रस्त्यांच्या जवळ आहे. त्यामुळे विकासकाने या भूखंडावर सदनिका बांधून देण्याचे स्वारस्य दाखवले आहे. त्यानुसार डिसीआर २०३४ नुसार जमिनीचा टिडीआर आणि बांधकामाचा टिडीआरच्या बदल्यात बांधून घेतल्या जाणार आहे. हे अधिमूल्य थेट महापालिकेच्या तिजोरीमधून दिले जाणार नसून महापालिकेला मिळणाऱ्या क्रेडीट नोटच्या स्वरुपात दिल्या जाणार आहेत.

(हेही वाचा – राष्ट्रवादीचा ‘हा’ तिसरा मंत्री ईडीच्या निशाण्यावर! 13 कोटींची मालमत्ता जप्त )

५२९ सदनिका बांधून भूखंडांसह महापालिकेकडे हस्तांतरीत

क्लासिक प्रोमोटर्स अँड बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड या विकासकाच्या मालकीची हा मोकळा भूखंड असून त्यावर प्रकल्प व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी सुमारे ५२९ सदनिका बांधून भूखंडांसह महापालिकेला हस्तांतरीत केल्या जाणार आहे. विकासकाला या बदल्यात हस्तांतरणीय विकास हक्क अर्थात टिडीआर व क्रेडीट नोटच्या रुपाने ८५ लाख रुपये दराने ४४९.६५ कोटी रुपयांचे अधिमूल्य दिले जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव सुधार समितीच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला असून या सदनिकांची बांधणी केल्यास प्रभादेवी, वरळी भागातील प्रकल्प बाधितांचा प्रश्न मिटणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.