मुंबई महापालिकेच्या राणीच्या बागेची जाहीरात पाहिलीत का? जाहिरातीला मिळतेय प्रसिद्धी

106

शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांचे वक्तव्य प्रसिद्ध झाले. आता याच वाक्यावरुन मुंबई महापालिकेच्या राणी बागेनेही आपली जाहीरात केली आहे. जीजामाता उद्यान- राणीबागेची जाहिरात शहाजी बापू पाटील यांच्या डायलाॅगवरुन प्रेरित आहे. “आम्ही राणीबागेत हाय आत्ता- काय झाडी, काय गर्दी, काय प्राणी ओक्केमध्ये हाय एकदम”, अशी ती जाहीरात आहे. वीर जीजामाता उद्यानच्या सोशल मीडियावरुन ही जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. या जाहिरातीलाही जोरदार प्रसिद्धी मिळत आहे.

( हेही वाचा: एकनाथ शिंदेंविरोधात केलेल्या कारवाईला कायद्याने उत्तर देणार; दीपक केसरकरांचा शिवसेनेला इशारा )

Jijamata Udyan 1

काय म्हणाले होते शहाजीबापू पाटील

शिवसेनेचे सांगल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या वाक्याची भूरळ सा-या महाराष्ट्राला पडली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनाही या वाक्याची भुरळ पडली. सर्व आमदार लाॅबीमध्ये आले असताना, त्यांनी शहाजीबापू पाटील यांचे कौतुक केले. त्यांचे सुपरहीट वाक्य पुन्हा म्हणून दाखवण्याची विनंती केली. काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल… एकदम ओक्के. कार्यकर्त्यांशी बोलताना ते असं म्हणाले. हे वाक्य आता संपूर्ण राज्यात प्रसिद्ध झाले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.