मुंबई खालिस्तानी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर! हाय अलर्ट जारी

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. पण, मुंबईकर या जय्यत तयारीत असतानाच, आता मुंबई खालिस्तानी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचे केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने सांगितले आहे. त्यामुळे आता मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या साप्ताहिक सुट्या रद्द करण्यात आल्या असून, त्यांना तातडीने ड्यूटीवर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुसरीकडे देशाची राजधानी दिल्लीतही कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.

दहशतवाद्यांच्या निशाण्यावर मुंबई

खालिस्तानी दहशतवादी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईत दहशतवादी हल्ला करू शकतात, अशी गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली आहे. गेटवे ऑफ इंडिया आणि मरीन ड्राईव्हसारख्या प्रमुख ठिकाणी होणारी लोकांची गर्दी लक्षात घेऊन शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबईत याआधी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मुंबई लोकल ट्रेनला टार्गेट करण्यात आले होते. या भीतीने मुंबईतील प्रमुख रेल्वे स्थानकांवरदेखील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

 ( हेही वाचा: मुंबापुरीत घर घेणा-यांसाठी आनंदाची बातमी !)

मद्यप्रेमींवर विशेष लक्ष

मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक पथके तैनात करण्यात आली आहे. रोडरोमिओंवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती दिल्ली पोलिसांचे प्रवक्ता चिन्मय बिस्वाल यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here