मुंबई पोलिसांची याकूबच्या कबरीवर कारवाई; कबरीवरील एलईडी लाईट्स काढून टाकल्या

118

मुंबईतील बाॅम्बस्फोटातील गुन्हेगार आणि कुख्यात दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभिकरण केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर, पोलीस आणि प्रशासन खडबडून जागे झाले आहे. सध्या या कबरीवरील एलईडी लाईट्स मुंबई पोलिसांनी काढून टाकल्या आहेत. आता महापालिकेचे एक पथकही कब्रस्तानमध्ये जाऊन पाहणी करणार असल्याची माहिती आहे. मुंबईच्या गुन्हेगाराच्या कबरीवर सजावट करणा-यांवर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

( हेही वाचा: मुंबईत पाच ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी; बोरिवली, सायनसह झोपडपट्टीतही धाडी )

शब-ए-बारातला संपूर्ण दफनभूमीला रोषणाई करण्यात येते. त्यामुळे याकुबच्या कबरीवरील रोषणाईचा फोटो जुना असू शकतो, अशी शक्यता बडा कब्रस्तानचा कर्मचारी अशफाक अहमदने दिली आहे. दरम्यान मुंबईला रक्तबंबाळ करणा-या याकुबचे स्मारक बनतेय का? देशाच्या दुश्मनाचे उदात्तीकरण कशासाठी? ज्याला 1993 च्या स्फोटात दोषी ठरवण्यात आले, त्याचे स्मारक का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.

भाजपचा मविआवर निशाणा

याकूब मेमनच्या कबरीच्या सुशोभिकरणावरुन भाजपचे आमदार राम कदम यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभिकरण झाले, असा आरोप भाजप आमदार राम कदम यांनी केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.