बापरे! मुंबईत सापडल्या 2000 च्या बनावट नोटा…

78

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत बुधवारी बनावट नोटांचा साठा सापडला. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने सात जणांना अटकही केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सात कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या सर्व नोटा २००० रुपयांच्या आहेत. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना न्यायालयाने ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने सात जणांना अटक केल्याचे डीसीपी संग्राम निशानदार यांनी सांगितले.

(हेही वाचा – एसटी कर्मचा-यांच्या कुटुंबाला भीक मागून, पोटाची खळगी भरावी लागतेय!)

या महिन्याच्या सुरुवातीला उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नगर कोतवाली भागातील इस्लामनगर येथून बनावट नोटांचा धंदा चालवत होते. त्यांच्या ताब्यातून ६.५९ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये १०० ते २००० च्या नोटांचा समावेश होता.

…तो बनावट नोटा बनवण्यात माहीर बनला

टोळीचा सूत्रधार यूट्यूबवरून बनावट नोटा कसा बनवायचा हे शिकला होता आणि सुमारे चार महिन्यांत तो बनावट नोटा बनवण्यात माहीर बनला होता. देशातील इतर यंत्रणांनाही याची माहिती देण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. छापा टाकला असता घरातून ६.५९ लाख किमतीच्या बनावट नोटा, संगणक, स्कॅनर, प्रिंटर आणि कागदाचे बंडल जप्त करण्यात आले.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.