गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याविरोधात का झाला गुन्हा दाखल? वाचा…

गुगलचे पहिले भारतीय सीईओ सुंदर पिचाई यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला. सुंदर पिचाई यांचे व्यापार आणि उद्योग या श्रेणीतील उल्लेखनीय योगदान पाहता त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी सुंदर पिचई यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,सुंदर पिचाई व्यतिरिक्त, यूट्यूबचे एमडी गौतम आनंद यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  यांच्यासह इतर Google च्या अधिकार्‍यांवर कॉपीराइट कलम 51, 63 आणि 69 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(हेही वाचा – खूशखबर! चंद्रपूरात टायगर सफारी सुरू होणार…)

न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी सुंदर पिचाई यांच्या विरोधात कॉपी राईटच्या कलमाखाली हा गुन्हा दाखल केला आहे. बॉलिवूडमधील निर्माते दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी मुंबईत गुगलचे सीईओ पिचाई आणि गुगलच्या सहा अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुनील दर्शन यांनी बनवलेला चित्रपट यूट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे. त्यानंतर न्यायालयाने मुंबई पोलिसांना गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश दिले होते. याच आदेशानंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कॉपीराइट उल्लंघन प्रकरणी २५ जानेवारी रोजी ही तक्रार नोंदवण्यात आली आहे. सुनील दर्शन यांनी सांगितले की, यूट्यूब आपल्या चित्रपट आणि संगीताच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहे आणि त्यासाठी ते ११ वर्षांपासून संघर्ष करत आहेत.

नेमके काय आहे प्रकरण

‘एक हसीना थी एक दिवाना था’ या चित्रपटाचे कॉपीराइट कोणालाही दिलेले नाहीत, असे चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी सांगितले. असे असूनही या चित्रपटाची गाणी आणि व्हिडिओ अनेकांनी गुगल आणि यूट्यूबवर अपलोड केले आहेत. चित्रपटाची गाणी आणि व्हिडिओ अपलोड होत असतानाच यूट्यूब आणि गुगलनेही अपलोड करण्याची परवानगी दिल्याचे त्यांनी सांगितले. ज्यामुळे त्यांनी करोडो रुपये कमावले आणि त्यांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सुनील दर्शन यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here