निर्भया पथकासह बीट पोलीस चौकीत काम करणाऱ्या महिला पोलीस अंमलदारांना बीट मार्शलप्रमाणे परिसरात गस्त घालण्यासाठी तसेच एखाद्या घटनेच्या ठिकाणी महिला पोलीस अंमलदारांना त्वरित पोहचण्यासाठी मुंबई पोलिसांनी महिला पोलिसांसाठी २०० अॅक्टिव्हा दुचाकी खरेदी करण्यात आलेल्या आहेत. या दुचाकी लवकरच मुंबई पोलिसांच्या ताफ्यात दाखल होणार आहे.
( हेही वाचा : मुंबई-गोवा महामार्गावर मेगाब्लॉक; परशुराम घाट रोज ५ तास राहणार बंद )
२०० अॅक्टिव्हा स्कुटी
मुंबईतील पोलीस ठाण्याच्या बीट चौकमध्ये नेमण्यात आलेल्या पुरुष बीट मार्शलला दुचाकी वाहने (बाईक्) पुरविण्यात आलेल्या आहे. घटनास्थळी तात्काळ पोहचणे, परिसरात गस्त करण्यासाठी या बाईक महत्वाच्या ठरतात. मात्र पोलीस ठाण्यातील महिला अंमलदार यांना बाईक चालविणे अवघड होतं असल्यामुळे महिला अंमलदार यांच्यासाठी मुंबई पोलिसांनी २०० अॅक्टिव्हा स्कुटी खरेदी केल्या आहेत. निर्भया पथकातील महिला अमलदारांना तसेच महिला बीट मार्शल यांना या स्कुटीचे वाटप लवकरच करण्यात येणार आहे.
इतर वाहने
त्याशिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही काही वाहने देण्यात येणार आहेत. गरजेनुसार या वाहनांचे वितरण केले जाणार आहे. त्यात २२० बोलेरो गाड्यांचा समावेश आहे. त्यातील ११० गाड्यांचे नोंदणीकरण झाले आहे. त्यानंतर त्या गाड्या पोलिसांच्या ताफ्यात सामील होतील. बोलेरो जीपसह ३५ इर्टिगा गाड्यांचाही यात समावेश असून त्यांची नोंदणी झाली आहे. ३१३ पल्सर मोटारसायकल देखील खरेदी करण्यात आलेली आहेत.
Join Our WhatsApp Community