मुंबईसह उपनगरात ओमायक्रोनचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच थर्टी फस्ट तोंडावर येऊन ठेपला आहे. अशा वेळी समुद्र किनारे, हॅाटेल्स आणि इमारती यामध्ये पार्ट्या आणि मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. त्यामुळे गर्दी होऊन ओमायक्रोनचा प्रादुर्भाव वाढेल, म्हणून मुंबई पोलिसांनी मुंबईत कलम १४४ लागू केला आहे. परिणामी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईत कुठेही थर्ट फस्टसाठी कार्यक्रमांचे आयोजन करता येणार नाही.
कोरोनाच्या नव्या व्हेरियंट ओमायक्रॉनमुळे देशाची चिंता पुन्हा वाढली आहे. मुंबईत ७ तर वसई विरारमध्ये १ ओमायक्रॉन बाधित आढळलेला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या २८ इतकी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात आढळल्याने राज्यात खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांनी मुंबईत कलम १४४ लागू आहे. कोरोना आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी परिपत्रक काढत १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत हे निर्बंध लागू केले आहेत.
(हेही वाचा -विदेश प्रवास केलेल्या व्यक्तिसह सात जण ओमायक्रॉनच्या विळख्यात!)
गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने देखील कोरोनाचे निर्बंध आखून दिले होते. यांचे पालन होत आहे की नाही, याची पडताळणी मुंबई पोलिसांकडून केली जाणार आहे. यासह ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी परिपत्र काढत कोविड नियमांचे पालन करण्याचे आवाहन सर्व मुंबईकरांना केले आहे.
असं आहे मुंबई पोलिसांचं परिपत्रक
• सर्व व्यक्ती ज्या एखाद्या कार्यक्रमाशी, सेवेशी निगडीत आहेत. आयोजक, सहभागी असणारे, अभ्यागत, पाहुणे, ग्राहक यांचे पूर्णपणे लसीकरण असायला हवे.
• कोणतेही दुकान, आस्थापना, मॉल, कार्यक्रम, मेळावे याठिकाणी आलेल्या व्यक्तींचे पूर्ण लसीकरण झालेलं हवं. अभ्यागत, ग्राहक यांचेही लसीकरण झाले पाहिजे.
•मुंबईतील सर्व सार्वजनिक वाहतूक सेवेने प्रवास करणाऱ्या व्यक्तींचे लसीकरण झाले असावे. पूर्ण लसीकरण न झालेल्या व्यक्तींना प्रवास करण्यावर बंदी
•महाराष्ट्रात येणाऱ्या किंवा प्रवास करणाऱ्या व्यक्तींचे पूर्ण लसीकरण अथवा ७२ तासांपूर्वी करण्यात आलेली आरटी पीसीआर चाचणी वैध असेल.
• कोणत्याही कार्यक्रम, स्पर्धा, मेळावे, समारंभ याठिकाणी क्षमतेच्या ५० टक्केच लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. जर एकूण उपस्थित लोकांची संख्या १ हजारापेक्षा जास्त असल्यास स्थानिक प्राधिकरणाला याबाबत माहिती द्यावी लागेल.