मुंबईत एक दिशा मार्गाने वाहने चालवणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त यांनी मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाला दिले आहे. या आदेशाची अंमलबजावणी सोमवारपासून सुरू करण्यात आली. सोमवारी दिवसभरात मुंबईत ८ ते १० वाहन चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पदभार स्वीकारताच अँक्शन मोडमध्ये आले आहे. पांडे यांनी एका पाठोपाठ एक निर्णय घेण्यास सुरुवात केली असून दोन दिवसांपूर्वी त्यांनी मुंबईतील वाहतुकीचा तसेच मुंबईतील मार्गाचा आढावा घेतला, यामध्ये एकदिशा मार्गाने विरुद्ध दिशेने वाहने चालविणाऱ्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघाताचे प्रमाण अधिक आहे.
(हेही वाचा उत्तर प्रदेशात पुन्हा मोदी-योगीच! अन्य राज्यांचा काय म्हणतो एक्झिट पोल?)
दंड नाही थेट गुन्हे दाखल
विरुद्ध दिशेने वाहने चालविणाऱ्यांना दंड न आकारात थेट त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश वाहतूक विभागाला दिले आहे. वाहतूक पोलिसांनी सोमवारपासून आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू केली आहे. सोमवारी दिवसभर वाहतूक पोलीस एक दिशा मार्गावर विरुद्ध दिशेने वाहने चालविणाऱ्यावर कारवाई करताना दिसून येत होते. सोमवारी मुंबईत विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या ८ ते १० वाहन चालकांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सर्वात अधिक गुन्हे पश्चिम उपनगरात नोंदविण्यात आले आले आहे.
Join Our WhatsApp Community