जातीय तेढ पसरवणाऱ्यांवर मुंबई पोलिसांचा वॉच! 12,800 सोशल मीडिया पोस्ट हटवल्या

140

राज्यासह देशातील सध्याची परिस्थिती पाहता समाजकटंकाकड़ून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आता सक्रिय झाले आहेत. जातीय वाद नियंत्रणात ठेवण्यासाठी मुंबईत सोशल मीडिया लॅब सोमवारी सक्रिय करण्यात आली आहे. देशभरात धार्मिक मुद्यावरून वातवरण तापले असताना मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने या वर्षांत आतापर्यंत सोशल मीडियावरील 12 हजार 800 प्रक्षोभक, आक्षेपार्ह पोस्ट हटवल्या माहिती समोर आली आहे. यासंदर्भात मुंबई पोलीस सतर्क असून सोशल मीडियावरील प्रक्षोभक पोस्टवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. महाराष्ट्रात शांतता राहावी यासाठी महाराष्ट्र एसआयडीची टीम दररोज 30 ते 35 अशा पोस्ट हटवत असल्याचे महाराष्ट्र पोलिसांनी सांगितले.

(हेही वाचा – गणपत पाटील नगरला जो न्याय तोच न्याय अंधेरीतील जमिनीसाठी का नाही? भाजपचा सवाल)

सोशल मीडिया लॅबकडून आक्षेपार्ह पोस्टवर कारवाई 

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने जानेवारीत 5 हजार 754, फेब्रुवारीत 4 हजार 252, मार्चमध्ये 3 हजार 958 पोस्ट हटवल्या आहेत. या अशा पोस्ट आहेत ज्या समाजात हिंसाचार पसरवू शकतात. मुंबई पोलिसांनी सोमवारी सांगितले की, मुंबईत जातीय वाद नियंत्रणात ठेवण्यासाठी सोशल मीडिया लॅब सक्रिय करण्यात आली आहे. यामुळे आता सोशल मीडियाचा वापर करत सामाजिक तेढ निर्माण करण्यांना आता चाप बसणार असून मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया लॅबकडून आक्षेपार्ह पोस्टवर कारवाई सुरू आहे.

https://twitter.com/ANI/status/1515935005801070596

सोशल मीडिया लॅबकडून आक्षेपार्ह पोस्टवर कारवाई करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी सोमवारी जातीय तेढ निर्माण करु शकणाऱ्या सुमारे 3000 पोस्ट मुंबई पोलिसांनी डिलीट केल्या आहेत. रामनवमी नंतर राज्यातील काही भागात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून सोशल मीडियावरील पोस्टवर वॉच ठेवले जात आहे.

या प्रकरणी मुंबईत सहा गुन्हे दाखल

महाराष्ट्रात रामनवमीपासून काही ठिकाणी हिंसाचार उसळला होता. या प्रकरणी मुंबईत सहा गुन्हे दाखल झाले आहेत. पहिला गुन्हा मानखुर्द पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. तसेच दुसरा गुन्हा मालवणी पोलीस ठाण्यात, तिसरा गुन्हा कुरारा पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. तसेच गोरेगावच्या आरे कॉलनीत एकूण तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मानखुर्दच्या म्हाडा वसाहतीमधील कोयना सोसायटीजवळ 40 ते 45 अनोळखी तरुणांच्‍या जमावाने वाहनांची तोडफोड केली होती. ही घटना रविवारी (दि.11) रात्री घडली होती. तरूणांच्या हातातील तलवार, लाकडी बांबू व ॲल्युमिनियम पाईपमुळे या भागात काही काळ दहशत पसरली होती. मानखुर्द प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 30 जणांना अटक केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.