मनसे अल्टिमेटमनंतर मुंबई पोलीस सज्ज! दंगल झाल्यास ५ मिनिटात पोहोचणार…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरातील मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. मात्र मनसेच्या या भूमिकेनंतर राज्यातील पोलीस यंत्रणा चांगलीच सतर्क झाली आहे. मनसेने दिलेल्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कोणताही अनुचित प्रकार किंवा दंगलसदृष्य परिस्थिती उद्भवल्यास मुंबई पोलीस पाच मिनिटात घटनास्थळी पोहोचणार आहेत असा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे.

( हेही वाचा : कोकण रेल्वे सुसाट! १ मे पासून ‘या’ गाड्या धावणार विद्युतवेगाने… )

३ मे साठी मुंबई पोलीस सज्ज

  • दंगा झाल्यास घटनास्थळी पाच मिनिटांत पोहोचणार
  • तातडीने पोहोचू शकणारी ३३ पथके तयार
  • SRPF ची ५७ पथके मुंबईत तैनात
  • ६ दंगल नियंत्रण पथके तैनात
  • संवेदनशील परिसरांची पाहणी करण्यात येणार

दरम्यान पोलीस यंत्रणा अनुचित प्रकार घडल्यास घटनास्थळी केवळ पाच मिनिटांत कशी पोहोचणार याबाबत अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असता यापूर्वीही पोलीस यंत्रणा अनुचित प्रकार घडल्यास ६ ते ७ मिनिटांत पोहोचली असल्याचे पोलीस यंत्रणांनी स्पष्ट केले आहे.

राज ठाकरेंचं अल्टिमेटम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १२ एप्रिल रोजी ठाण्यातील आपल्या सभेत भोंग्यांच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा आवाज उठवला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत ३ मेपर्यंत राज्यातील मशिदींवरील भोंगे हटवण्याचे आवाहन राज्य सरकारला केले होते. यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा दाखला दिला होता. भोंगे हटले नाहीत तर मशिदींसमोर हनुमान चालिसा लावणार म्हणजे लावणार असंही राज ठाकरे यांनी यावेळी म्हटले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here