एका निनावी व्यक्तीने पत्राद्वारे समता नगर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडून होणाऱ्या हद्दीतील वसुलीचे रेट कार्ड मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस आयुक्त यांना पाठविले आहे. त्यामुळे यानिमित्ताने मुंबई पोलिसांतील आणखी एक वाझे समोर आला आहे.
हा पोलीस अधिकारी विविध व्यापारी समुदायातील सदस्यांना टार्गेट करत आहे. त्यांच्याकडून खंडणी वसूल करण्याचे ‘रेट कार्ड’ तयार केले आहे. हा पैसा वर कुणा पर्यंत पोहचत होता, असा प्रश्न आता विचारण्यात येत आहे.
असे आहे रेट कार्ड!
- आंचल बार 75,000/- दरमहा
- नित्यानंद बार 75,000/- दरमहा
- ललित बार 75,000/- दरमहा
- सावली बार 75,000/- दरमहा
इतर लेडीज बार
रु.50,000/- ते 75,000/- प्रति महिना
बार आणि रेस्टॉरंट्स
रु.60,000/- दरमहा
कार्ये आणि पार्टी आयोजित करण्यासाठी प्रति कार्यक्रम रु.2,000/-
बिल्डर्स आणि डेव्हलपर्स
- शिवम बिल्डर्स – रु. 50,000/- प्रतिमाह
- लोढा बिल्डर्स रु.50,000/- दरमहा
- यूके बिल्डर्स- रु.50,000/- प्रति महिना
- आदित्य बिल्डर्स 50,000/ – प्रतिमाहिना
इतर बांधकाम व्यावसायिक
रु.40,000/- प्रति महिना