मुंबई पोलीस Sunday Street उपक्रम; वांद्रे – वरळी Sea Link मार्गावर सायकल रॅली!

103

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ट्विटरवर ३ एप्रिलपासून संडे स्ट्रीट उपक्रम दर रविवारी जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे याची घोषणा केली होती. यानुसार आता  मुंबई पोलिसांच्या संडे स्ट्रीट्स या उपक्रमाचा भाग म्हणून ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सायकल रॅली काढण्यात येणार आहे.

( हेही वाचा : कोकण रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! असा करा अर्ज)

मुंबई पोलीस संडे स्ट्रीट (Sunday Streets) उपक्रम

  • सायकल रॅलीसाठी चार मार्गांचे सीमांकन करण्यात आले आहे.
  • दहिसर ते वांद्रे रेक्लेमेशन
  • एनसीपीए ते वांद्रे रेक्लेमेशन
  • मुलुंड ते वांद्रे रेक्लेमेशन
  • मानखुर्द ते वांद्रे रेक्लेमेशन
  • वांद्रे – वरळी सी-लिंक या मार्गावर सहभागी होण्यासाठी सायकल स्वारांना विशेष पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे.

स्मार्ट कम्युट फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने रविवारी ५ जूनला पहाटे ५.३० ते सकाळी ९.३० या दरम्यान रॅलीचे आयोजन केले जाईल. असे पोलीस उपायुक्त राज टिळक रोशन यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे. सहभागींनी सुरूवातीच्या ठिकाणांपासून सहभागी होण्याची आवश्यकता असून प्रत्येकजण आपआपल्या प्रभागातून सहभागी होऊ शकतात आमचे स्वयंसेवक सर्वांना मार्गदर्शन करतील असे फिरोजा सुरेश यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.