मुंबई पोलिसांकडून सलमान खानला Y+ सुरक्षा, काय आहे प्रकरण?

175

बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानला बऱ्याच दिवसांपासून धमक्या येत होत्या, त्यानंतर त्याची सुरक्षा वाढवण्यात आली होती. अशातच मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा सलमानची सुरक्षा कडक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिष्णोई लॉरेन्सने सलमानला पुन्हा एकदा बिश्नोई गँगकडून धमकी दिली आहे. हीच टोळी आहे जी पंजाबी गायक सिद्दू मुसेवाला यांच्या हत्येचाही आरोपी आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकार अभिनेत्याच्या सुरक्षेबाबत तडजोड करू इच्छित नाही आणि म्हणूनच त्याला Y+ श्रेणीची सुरक्षा देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – वन मॅन शो! संचालक मंडळ बरखास्त, आता एलॉन मस्क स्वत: बनणार ट्विटरचे CEO!)

२४ तास सुरक्षा रक्षक तैनात

सलमान खानसोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. या दोन्ही व्हीआयपींसोबत 4 सशस्त्र सुरक्षा रक्षक 24 तास तैनात असणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला एक निनावी पत्र सलमान आणि त्याचे वडील सलीम खान यांच्या नावाने आले होते. यानंतर सलमानने त्याविषयी मुंबई पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणाने बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडाली होती.

लॉरेन्स बिष्णोईकडून आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीमुळे मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या धमकी प्रकरणानंतर काही दिवसांपासून मुंबई पोलिसांचा कडा पहारा सलमान खानच्या घरी सुरू होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.