मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर सहा वाहनांची धडक आणि…

110

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी सकाळी साडे सहा वाजता सहा वाहनांची धडक होऊन, अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. इतर वाहनांमधील 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात 5 जण किरकोळ जखमी झाले असून, त्यांना पनवेलच्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

घनास्थळी सुरक्षा दल दाखल

पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या महामार्गावर दोन मार्गिकेमधून दोन कंटेनर जात होते. त्यावेळी मागील छोट्या वाहनांना पुढे जाण्यासाठी जागाच उरली नव्हती. या दोन कंटेनरमधून वेन्यू कारने पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यात दोन कंटेनरमध्ये ही कार चेपली गेली. त्यामुळे कारचा चक्काचूर झाला. पुण्यातील या गाडीमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिच्या मागोमाग येणारी आणखी एक कार त्यांना धडकली. एक ट्रक, एक आयशर टेम्पो आणि स्विफ्ट व वेन्यू कार अशी चार वाहने या अपघातात सापडली आहेत. या अपघाताची माहिती मिळताच, घटनास्थळी महाराष्ट्र सुरक्षा दल, देवदूत रेस्क्यु टीम आणि खोपोली, खंडाळा महामार्ग पोलीस दाखल झाले. या अपघाताने मुंबईकडे जाणार्‍या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

(हेही वाचा – वैद्यकीय शिक्षण विभाग चालवते कोण?)

भीषण अपघातात मृत्यू

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात आज पहाटे सहा वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका कारचा दोन मोठ्या वाहनांच्यामध्ये चेंदामेंदा झाल्याने, चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर वाहनांमधील 3 जण गंभीर तर 5 जण किरकोळ जखमी झाले आहेत.

या वाहनांचा समावेश

दोन कंटेनर, दोन कार, टेम्पो व ट्रक अशा सहा वाहनांचा हा अपघात आहे. सर्व वाहने मुंबईच्या दिशेने जात असताना, हा अपघात झाला आहे. घटनेची माहिती मिळताच आयआरबी, देवदूत यंत्रणा, लोकमान्यची यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीला संस्थेचे पथक, बोरघाट व खोपोली पोलीस यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी धाव घेत, मयत व जखमी यांना वाहनांमधून बाहेर काढण्यात आले.

अपघातातील वाहने

1) कंटेनर नं MH 46 BM 5259
2) कार नं MH 21 BQ 5281
3) ट्रक नं MH12 SX 2127
4) टेम्पो नं MH 10 AW 7611
5) स्विफ्ट कार MH 13 BN 7122
6) ट्रक MH 46 AR 3877

मयत व्यक्ती

1) गौरव खरात वय-36
2) सौरभ तुळसे वय-32
3) सिद्धार्थ राजगुरू वय-31
4) नाव अद्याप अस्पष्ट.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.