मुंबई-पुणे एक्सप्रेसवे हा भारतातील पहिला ६-लेन रुंद काँक्रीट, प्रवेश नियंत्रित टोल एक्सप्रेसवे आहे. हा एक्सप्रेसवे ९४.५ किमी अंतरावर प्सरलेला आहे. रायगड-नवी मुंबई-मुंबई, महाराष्ट्र राज्याची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी, महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी पुणे यांना जोडला जातो. यास अधिकृतपणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग असेही म्हटले जाते. (Mumbai Pune Expressway)
हा मार्ग २००२ मध्ये पूर्णपणे कार्यान्वित झाला. हा भारतातील सर्वात व्यस्त रस्त्यांपैकी एक आहे. मुंबई ते पुण्याला जोडणारा द्रुतगती मार्ग बांधण्यासाठी १६.३ अब्ज रुपये (१६३० कोटी) खर्च करण्यात आले आहेत. या ६ लेन एक्स्प्रेसवेद्वारे मुंबई ते पुणे फक्त २ तासाच्या अंतरावर आहे. हा द्रुतगती मार्ग रायगड जिल्ह्यातील नवी मुंबईतील कळंबोली येथून सुरू होऊन पुण्यातील किवळे येथे संपतो. (Mumbai Pune Expressway)
सह्याद्री पर्वताच्या शिखरांना वेढा घालून बोगद्यांमधून हा मार्ग जातो. यात पाच इंटरचेंज आहेत: कोन (शेडुंग), चौक, खालापूर, कुसगाव आणि तळेगाव. या द्रुतगती मार्गावर दोन कॅरेजवे आहेत, प्रत्येकी तीन काँक्रीट लेन आहेत, मध्य दुभाजकाद्वारे विभक्त केलेले आहेत आणि दोन्ही बाजूला डांबरी किंवा काँक्रीट शोल्डर आहेत. (Mumbai Pune Expressway)
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे बनवण्याचे श्रेयही नितीन गडकरींना जाते. नितीन गडकरी तेव्हा महाराष्ट्र सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. या द्रुतगती मार्गाला समोर ठेवूनच विकसित भारताची ब्लू प्रिंट तयार करण्यात आली, ज्यामध्ये वाहतुकीवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. या मार्गावरुन गाडी चालवणे सुरक्षित असल्याचे म्हटले जाते. विशेष म्हणजे हा भारतातील पहिला मोठा ६-लेन एक्सप्रेसवे आहे. (Mumbai Pune Expressway)
Join Our WhatsApp Community