Mumbai-Pune Sinhagad Express : मुंबई – पुणे सिंहगड एक्स्प्रेसला एक अतिरिक्त डब्बा जोडला जाणार

मध्य रेल्वेने सर्व प्रवाशांना त्यांच्या प्रवासादरम्यान कोविड नियमांचे पालन करण्याची आठवण करून दिली आहे, जेणेकरून त्यांची स्वतःची तसेच इतरांची सुरक्षितता सुनिश्चित होईल.

267
Mumbai-Pune Sinhagad Express
Mumbai-Pune Sinhagad Express : मुंबई - पुणे सिंहगड एक्स्प्रेसला एक अतिरिक्त डब्बा जोडला जाणार

प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे येत्या १ मे २०२३ पासून मध्य रेल्वेने मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेसच्या रचनेत बदल केला आहे. त्यानुसार आता मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेसमध्ये (Mumbai-Pune Sinhagad Express) द्वितीय श्रेणी चेअर कार कोच (नॉन-एसी) जोडला जाणार आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेसला द्वितीय श्रेणीच्या चेअर कार कोच वाढवून, मध्य रेल्वेने आपल्या सर्व प्रवाशांना आरामदायी आणि सुरक्षित प्रवास कसा करता येईल याचा विचार केला आहे.

(हेही वाचा – Central Railway : रेल्वे प्रवासी आणि टीसी यांच्यातील वादावर मध्य रेल्वेने काढला तोडगा)

मध्य रेल्वेने दिलेल्या तपशिलानुसार

11009 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – पुणे सिंहगड एक्स्प्रेसला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दिनांक १ मे २०२३ पासून तर; (Mumbai-Pune Sinhagad Express)
11010 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेसला पुणे येथून दि. १ मे २०२३ पासून हा अतिरिक्त डब्बा जोडला जाणार आहे.

हेही पहा – 

मुंबई – पुणे सिंहगड एक्स्प्रेसची सुधारित संरचना :

ट्रेनच्या सुधारित रचनेत (Mumbai-Pune Sinhagad Express) आता १६ डबे असतील, ज्यात एक एसी चेअर कार, १३ द्वितीय श्रेणी आसनव्यवस्था, एक लगेज कम गार्डची ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कार असेल.

मुंबई – पुणे सिंहगड एक्स्प्रेस कडून प्रवाशांना विनंती

मध्य रेल्वेने (Mumbai-Pune Sinhagad Express) सर्व प्रवाशांना त्यांच्या प्रवासादरम्यान कोविड नियमांचे पालन करण्याची आठवण करून दिली आहे, जेणेकरून त्यांची स्वतःची तसेच इतरांची सुरक्षितता सुनिश्चित होईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.