Mumbai Rain update: मिठी नदीत दोन तरुण बुडाले; एकाचा मृत्यू तर एकाचा शोध सुरु

78

मुंबईच्या माहिम येथील दर्ग्यात दर्शन घेण्यासाठी आलेले दोन तरुण मिठी नदीत वाहून गेल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री माहिम खाडीवर उभे असताना, एका मित्राचा पाय घसरल्याने, तो वाहून गेला. त्याला वाचवण्यासाठी दुसर-याने धाव घेतली आणि तोही वाहून गेला. मध्यरात्री भरती असल्याने, अग्निशमन दलाला बचाव कार्य करता आले नाही. मात्र, पाणी ओसरताच एकाचा मृतदेह किना-यालगत आढळून आला तर दुस-याचा शोध सुरु आहे. जावेद आणि आसिफ अशी वाहून गेलेल्यांची नावे आहेत.

( हेही वाचा: पुणे- मुंबई रेल्वेमार्गावर दरड कोसळली; मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा बंद )

एकाचा मृत्यू, तर दुस-या मित्राचा शोध सुरु 

कुर्ला येथील दोन तरुण जावेद आणि आसिफ माहीम दर्ग्यात दर्शनासाठी गेले होते. दर्शन झाल्यावर दोघेही जवळच असलेल्या माहिमच्या खाडीवर गेले. मध्यरात्री घरी जात असताना, शौचाला जाण्यासाठी दोघेही खाडीजवळ गेले. त्यावेळी दोघांपैकी एकाचा पाय घसरला आणि तो खाडीत पडला. अग्निशमन दल आणि पोलिसांना सांगण्यात आले. पण मध्यरात्री मुसळधार पाऊस असल्याने, अग्निशमन दलाला बचाव कार्य करता आले नाही. मात्र पहाटे पाणी ओसरताच एका तरुणाचा मृतदेह किना-यालगत आढळून आला. तर दुस-या मित्राचा शोध अद्याप सुरु आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.