Mumbai Traffic: वाहतूक कोंडीत मुंबई जगात तिसऱ्या क्रमांकावर!

100

कित्येक लोक मुंबईत आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी येत असतात. त्यामुळे मुंबईला स्वप्नांची मायानगरी असेही म्हटले जाते. लाखो लोक या मुंबईत प्रवास करत असतात. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची रहदारी देखील त्याच प्रमाणात असते. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वाहनांच्या वापरामुळे मुंबईत वाहतूक कोंडी होत असते आणि ही समस्या काही नवी नाही. दरम्यान, असा एक अहवाल समोर आला आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की, वाहतूक कोंडीमध्ये तुर्कीची राजधानी इस्तांबूल आणि कोलंबियाची राजधानी बोगोटानंतर मुंबई जगात तिस-या क्रमांकावर आहे. इतकेच नाही तर या वाहतूक कोंडीत मुंबईकरांचे वर्षातील साधारण १२१ तास वाया जात आहे.

(हेही वाचा – NLEM: केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेमुळे महागडी औषधं मिळणार स्वस्त!)

अहवालानुसार मुंबईतील वाहतूक कोंडी

२०१०-२०११ मध्ये दर प्रतिकिलोमीटर अंतरावर ५९५ दुचाकी वाहने होती. तर २०२१-२०२२ मध्ये ही संख्या ९७५ होती. उपलब्ध रस्त्यांच्या तुलनेत वाहनांच्या संख्येत जास्त वाढ झाली आहे. पश्चिम द्रुतगती मार्ग सुसाट असला तरी मेट्रोच्या कामामुळे, पडलेले खड्डे आणि बेशिस्त वाहन चालकांमुळे या मार्गावरील वाहतूक कोंडीत अधिक भर पडली. यासह मुंबईकरांना दररोज सकाळी ८ ते ११ आणि संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

कोणत्या शहराचा वाहतूक कोंडीत जातो वेळ वाया
(वर्षनिहाय तासानुसार)

  • १२१ मुंबई
  • ११० बंगळूर
  • ११० नवी दिल्ली
  • ९६ पुणे
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.