मुंबईतील रस्ते, उद्याने, समुद्रकिनारे मार्च २०२३ पर्यंत होणार चकाचक…

मायानगरी मुंबई आता चकाचक होणार आहे. कारण मुंबईतील रस्ते, पूल, पदपथ, वाहतूक बेटे, समुद्र किनारे, उद्याने या ठिकाणी स्वच्छता, सुधारणा, सुशोभीकरण, आकर्षक प्रकाश योजना अशी कामे तातडीने हाती घ्यावीत आणि सर्व कामे मार्च २०१३ अखेर पूर्ण करावयाची असली तरी किमान ५० टक्के कामे डिसेंबर २०१२ अखेर पूर्ण करावीत, असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी प्रशासनाला दिले आहेत. मुंबईचे सौंदर्य वाढविण्यासाठी महापालिकेने महानगर सौंदर्यीकरण प्रकल्प राबविण्याचे निश्चित केले आहे. त्याचा प्राथमिक आराखडा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चहल यांनी सादर केला होता. यावर मुख्यमंत्र्यांनी कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

(हेही वाचा – Chandigarh University: अंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने 8 जणींनी उचलले टोकाचं पाऊल)

मायानगरी होणार चकाचक

  • पावसाळा संपताच रस्त्यांची दुरुस्ती कऱण्यात येणार आहे. तर रस्ते दुभाजकांमधील मोकळ्या जागेत सुशोभित फुलझाडांची लागवड करण्यात येणार आहे.
  • प्रत्येक विभागात किमान १५ किलोमीटर लांबीच्या पदपथांची सुधारणा आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
  • स्टॅम्प कॉंक्रिट, आकर्षक विद्युत दिवे, अतिरिक्त जागेत शोभिवंत कुंड्यांचा वापर करून पदपथांची निर्मितीसह रस्त्यावरील पथदिव्यांचे सुशोभीकरण आणि विद्युत खांबांना प्रकाश योजना करण्यात येणार आहे.
  • पुलांवर रंगरंगोटी आणि विद्युत रोषणाई, स्कायवॉकवर स्वच्छता, रंगरंगोटी आणि विद्युत योजनेची कामे करण्यात येणार आहे.
  • प्रत्येक विभागात १० वाहतूक बेटांचे सुशोभीकरण, वृक्ष लागवड, हिरवळ फुलविणे, कारंजे लावणार असून किनाऱ्यांवर विद्युत व्यवस्था, प्रकाश योजना, कलाकृती निर्माण करणार आहे.
  • सर्व अधिकृत जाहिरात फलक येत्या ६ महिन्यांत टप्प्याटप्प्याने डिजिटल होणार आहे. पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर सर्व जाहिरात फलक १०० टक्के डिजिटल झालेले दिसून येणार आहे.
  • किल्ल्यांवर विद्युत रोषणाई, गेटवे ऑफ इंडिया परिसराचे सुशोभीकरण, मियावाकी पद्धतीने १ लाख वृक्ष लावणार
  • पदपथ, दुभाजक, भिंती, रस्त्यांवरील फलक, पुलांच्या स्वच्छतेसाठी यांत्रिक स्वच्छता उपकरणांचा वापर
  • झोपडपट्टी परिसरांमध्ये कचरा संकलनाच्या डब्यांची संख्या वाढणार. यासह झोपडपट्टी परिसरांमध्ये सुविधा केंद्र उभी राहणार आहेत.

या सर्व मुद्द्यांवर कामे लवकरात लवकर सुरु करण्यासाठी जलद प्रशासकीय कार्यवाही करण्यात येणार आहे. सौंदर्यीकरण करण्यापूर्वीची आणि नंतरची छायाचित्रेही काढण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here