वकील सदावर्तेंनंतर जयश्री पाटील यांची अटक टळली

मुंबईतील सिलव्हर ओक हल्ला प्रकरणातील आरोपी आणि गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी अॅड जयश्री पाटील यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर शुक्रवारी मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. मात्र शुक्रवारी न्यायालयाने कोणताच निकाल न देता तो राखून ठेवला होता. दरम्यान शनिवारी, मुंबई सत्र न्यायालयाने जयश्री पाटील यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे जयश्री पाटील यांना दिलासा मिळाला असून त्यांची अटक टळल्याची माहिती मिळतेय.

(हेही वाचा – राणा दाम्पत्याला दणका! न्यायालय म्हणतंय, तुरुंगातलंच जेवण करा! )

काय आहे प्रकरण?

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानावर ८ एप्रिल रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी दगडफेक करून हल्ला केला होता. या प्रकऱणी जयश्री पाटील यांच्यावर आरोप करण्यात आला होता. मागील सुनावणीदरम्यान, त्यांना अटकेपासून अंतरिम दिलासा मिळाला होता. याप्रकरणी शुक्रवारी जामीन अर्जावर युक्तीवादाची सुनावणी पार पडली. या प्रकरणातील १११ आरोपींसह वकील गुणरत्न सदावर्तेंना देखील मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. यामध्ये सर्व आरोपी जामिनावर सुटले आहेत, तर शनिवारी जयश्री पाटील यांनाही अटकपूर्व जामीन मिळाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

(हेही वाचा – पटियालात तणावपूर्ण परिस्थिती; तलवारी नाचवलेल्या गोंधळानंतर शिवसेना नेत्याला अटक आणि …)

पवारांच्या घराबाहेर झालेल्या आंदोलनानंतर राज्यात अनेक ठिकाणी गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र मंगळवारी २६ एप्रिल रोजी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील सदावर्ते यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. पुण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये न्यायालयाने सदावर्तेंना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

२५ हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका

न्यायालयाने सदावर्तेंना अटकपूर्व जामीन दिल्यानंतर २५ हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत. २०२० मध्ये सदावर्ते यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याप्रकऱणी ताबा मिळवण्यासाठी पुणे पोलिसांकडून अर्ज दाखल कऱण्यात आला आहे. परंतु, कोल्हापूर पोलीस सदावर्तेंना घेऊन ऑर्थर तुरूंगाकडे रवाना झाले असल्याचे सांगितले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here