‘त्या’ प्रकरणात मुंबई एसआयटी करणार गुन्हा दाखल 

शुक्रवारी या प्रकरणात किरण गोसावीच्या विरोधात गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

आर्यन खानच्या सुटकेसाठी झालेल्या १८ कोटींच्या डील प्रकरणी मुंबई पोलिसांच्या एसआयटी(स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम)कडून किरण गोसावी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एसआयटीच्या हाती लागलेल्या पुराव्यांवरून शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

काय होते डील?

क्रूझ ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला अटक न होता त्याची सुटका व्हावी, यासाठी किरण गोसावीने शाहरुख खानच्या मॅनेजर सोबत १८ कोटी रुपयांचे डील केले होते, असा खुलासा क्रूझ ड्रग्स प्रकरणातील पंच प्रभाकर साईलने केला. त्यानंतर या प्रकरणाला एक वेगळेच वळण लागले आहे.

(हेही वाचाः सचिन पाटील नावाने करायचा फसवणूक! पोलिसांनी मांडली गोसावीची मोडस ऑपरेंडी)

कुठे झाले डील?

हे डील लोअर परळ येथे एका मर्सडीझ गाडीत झाल्याचे प्रभाकर साईल याने एसआयटीला दिलेल्या जबाबात म्हटले आहे. किरण गोसावी आणि पूजा दादलानी या दोघांत हे डील झाल्याचे त्याने सांगितले आहे. यावेळी पूजा दादलानी कडून ५० लाख रुपयांची रोकड घेण्यात आली होती, असाही आरोप साईलने केला होता.

(हेही वाचाः गोसावी म्हणतो, मी मराठी असल्याने माझ्या पाठिशी राहा!)

एसआयटीच्या हाती लागले पुरावे

दरम्यान एसआयटीने या प्रकरणात तपास सुरू करून, लोअर परळ येथे झालेल्या या बैठकीचे सीसीटीव्ही फुटेज एसआयटीच्या हाती लागले आहे. या फुटेजमध्ये मर्सडीझ गाडी आणि तिच्या मागे दोन इन्होवा मोटारी दिसून येत आहेत. तसेच इतरही काही पुरावे एसआयटीच्या हाती लागले असून, एसआयटी कडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी या प्रकरणात किरण गोसावीच्या विरोधात गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here