भाडेवाढीसाठी टॅक्सी संघटना आक्रमक; ‘या’ तारखेपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा

गेल्या काही दिवसांत पेट्रोलसह सीएनजीच्या दरात वाढ होत आहे. मात्र असे असतानाही कॅब आणि टॅक्सीचे भाडे अद्याप वाढवण्यात आलेले नाही. सीएनजी दरात वाढ करण्यात आल्याने आता टॅक्सीच्या भाड्यात सुधारीत भाडेवाढ लागू करण्यात यावी, अशी मागणी टॅक्सी संघटनेकडून करण्यात आली आहे. या भाडेवाढीची मागणी मंजूर करण्यात न आल्यास १५ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा टॅक्सी संघटनांकडून देण्यात आला आहे.

(हेही वाचा – NIA ॲक्शन मोडमध्ये! देशातील 60 हून अधिक ठिकाणांवर छापेमारी)

वाढते इंधन दर लक्षात घेता टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्यात यावी, अशी मागणी टॅक्सी संघटनांकडून करण्यात आली आहे. वाढत्या भाडेवाढीसाठी टॅक्सी संघटना आक्रमक होत भाडेवाढ न झाल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशारा टॅक्सी संघटनांकडून देण्यात आला आहे.

यासह टॅक्सी चालक आणि रिक्षा चालक संघटनांकडून राज्य सरकारने तातडीने भाडेवाढीबाबात निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मुंबईत प्रति किलोमीटरसाठी २५ रूपये दर आहे, यामध्ये आता १० रूपयांची वाढ करण्यात यावी, अशी मागणी टॅक्सी चालकसंघटनांकडून करण्यात येत असून जर मागणी मान्य न झाल्यास टॅक्सी चालकांनी १५ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here